Sanjay Raut News Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut on Assembly Election Result : छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव धक्कादायक, तेलंगणातील निकाल अनपेक्षित : संजय राऊत

Assembly Election Result Update : देशातील पाच पैकी चार राज्यांची निकाल लागलेत. तेलंगणा काँग्रेसने अनपेक्षितपणे जिंकलंय. तेलंगणात एमआयएम फक्टर चालला नाही, केसीआर चालले नाहीत.

प्रविण वाकचौरे

Assembly Election 2023 News :

देशातील विधानसभा निवडणूक निकालावर शिवेसना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत सर्व सामने जिंकले, फायनलमध्ये हरले ना, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी काँग्रेसच्या पराभवावर दिली आहे.

देशातील पाच पैकी चार राज्यांची निकाल लागलेत. तेलंगणा काँग्रेसने अनपेक्षितपणे जिंकलंय. तेलंगणात एमआयएम फक्टर चालला नाही, केसीआर चालले नाहीत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. याचा परिणाम तिथे दिसल आहे.  (Latest Marathi News)

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव धक्कादायक

राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी नवीन सरकार येतं. तरीही तिथे काँग्रेसला 70 च्या आसपास मिळतील आणि भाजपला 110 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव धक्कादायक आहे. छत्तीसगडचा परभाव का झाला, याचं आत्मचिंतन काँग्रेसने करावं, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य प्रदेशातील पराभव काँग्रेसची जबाबदारी

मध्य प्रदेशातील काँग्रेसचा पराभव कमलनाथ यांचा पराभव मी मानतो. कारण प्रियांका गांधी, राहुल गांधी यांची मेहनत नाकारता येणार नाही, त्यांना प्रतिसाद उत्तम होता. अनेक काँग्रेसच्या राज्यात बड्या नेत्यांना जनतेनं नाकारलं आहे. तेलंगणात नवीन चेहरा काँग्रेसने दिला म्हणून जनतेने रेवंथ रेड्डी यांना निवडलं, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये इंडिया आघाडी म्हणून लढले असते तर नक्कीच फायदा झाला असता. इतर पक्षांना काँग्रेसने सोबत घ्यायला हवं होतं. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांची काही ठिकाणी ताकद आहे. त्यांना 10 -12 जागा द्यायला हव्या होत्या. मात्र कमलनाथ यांनी ही युती होऊ दिली नाही याचा काँग्रेसला फटका बसला. प्रादेशिक पक्षांना डावलून चालणार नाही, हे या निकालातून स्पष्ट झालं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. (Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE)

ईडी सीबीआयचं अभिनंदन

जो जिता वही सिकंदर याप्रमाणे निर्णय मान्य करायला हवा. पंतप्रधान मोदी-शाहा यांनी देखील जोरदार प्रचार केला. ईडी-सीबीआय तपास यंत्रणांचे देखील अभिनंदन केले पाहिजे. निवडणूक काळात ते विरोधकांच्या घरांवर धाडी टाकत होते. मात्र हा खरोखर जनतेचा कौल असेल तर आम्ही तो मान्य करतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT