Kedar Dighe To CM Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: सामान्य शिवसैनिकांवर दबाव टाकाल तर...; ठाण्याच्या दिघेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Kedar Dighe Slams CM Eknath Shinde | केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना दोन भागांत विभागली गेली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट म्हणजे शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली आहे. दोन्ही गटातील शिवसैनिकांचा आपआपसातच संघर्ष सुरू झाला आहे. खरी शिवसेना कुणाची याबाबत कोर्टात दोन्ही गटांची न्यायालयीन लढाई सुरू आहे, मात्र उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक आमनेसामने येतात तेव्हा अनेकदा संघर्ष होतो. याबाबत आता थेट दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे हे शिंदे गटाविरोधात मैदानात आले आहेत. सामान्य शिवसैनिकांवर चुकीची कारवाई कराल आणि दबाव टाकाल तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा केदार दिघेंनी दिला आहे. (Kedar Dighe Latest News)

हे देखील पाहा -

केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेने आता ठाणे जिल्ह्याची जबाबदारी केदार दिघेंकडे सोपवली आहे. केदार दिघे यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून अनेक ठिकाणी शिवसैनिकांवर हल्ले होत आहेत. याच पार्श्वभूमीवर केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा दिला आहे.

केदार दिघे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे! ठाणे हा शिवसेनेचा, दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे. जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करुन स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल आणि दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल!" असं म्हणत केदार दिघेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला केला आहे.

खरी शिवसेना कुणाची याबाबत कोर्टात दोन्ही गटांची न्यायालयीन लढाई सुरू आहे, मात्र उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक आमनेसामने येतात तेव्हा अनेकदा संघर्ष होतो. याचाच प्रत्यय आजही, मंगळवारी डोंबिवलीत आला. शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला होता. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये हा राडा झाला. शिंदे समर्थक शिवसेनेच्या डोंबिवली (Dombivali) मध्यवर्ती शाखेत घुसले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला होता. यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडले.

एकुणच पाहता शिवसेनेमध्ये आलेल्या बंडखोरीच्या भुकंपामुळे शिवसेना हादरली आहे. ४० आमदारांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अॅक्टीव्ह झाले असून दोघेही डॅमेज कंट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत. यासाठी शिवसेनेत अनेक संघटनात्मक बदल केले गेले आहेत, सोबतच अनेकांनी हकालपट्टीही करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Shreeram Lagoo: अभिनयाची आवड, ४२ व्या वर्षी डॉक्टरकीला रामराम, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: शरद पवार यांच्या बॅगांची रायगडमध्ये तपासणी

SCROLL FOR NEXT