Dombivali: शिवसेनेच्या शाखेत राडा! शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपापसात भिडले

Dombivli Shivsena News : शिंदे गटातील ४०० ते ५०० जणांनी शिवसेना शाखेत घुसून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
Dombivli Shivsena Shakha Rada News
Dombivli Shivsena Shakha Rada NewsSaam Tv
Published On

डोंबिवली: शिवसेनेच्या (Shivsena) डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला आहे. शिंदे समर्थक शिवसेनेच्या डोंबिवली (Dombivali) मध्यवर्ती शाखेत घुसले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. (Dombivali Shivsena News)

हे देखील पाहा -

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना दोन भागांत विभागली गेली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजे शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली आहे. दोन्ही गटातील शिवसैनिकांचा आपआपसातच संघर्ष सुरू झाला आहे. खरी शिवसेना कुणाची याबाबत कोर्टात दोन्ही गटांची न्यायालयीन लढाई सुरू आहे, मात्र उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक आमनेसामने येतात तेव्हा अनेकदा संघर्ष होतो. याचाच प्रत्यय पुन्हा डोंबिवलीत आला आहे.

Dombivli Shivsena Shakha Rada News
ED Raid: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? ईडीची आणखी दोन ठिकाणी छापेमारी

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो या शिवसेना शाखेतून काढण्यात आले होते. यामुळे शिंदे गटाचे समर्थक आक्रमक झाले आणि शिंदे गटातील ४०० ते ५०० जणांनी शिवसेना शाखेत घुसून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला शिवसैनिक, तरुण आणि पुरुष शिवसैनिक असे सगळ्याच वयोगटातील शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले आहेत. रामनगर पोलिस याठिकाणी पोहोचले आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याठिकाणी डोंबिवली पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com