देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसाठी असं काही केलं, ज्याने दोघांची मैत्री 'पुन्हा' उघड झाली; नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis And Ajit Pawar Friendship | अजित पवार हे विरोधी पक्षात असतानाही सरकारकडून आपलं काम काढून घेण्यात किती पटाईत आहे हे पुन्हा दिसून आलं आहे.
Devendra Fadnavis And Ajit Pawar Friendship
Devendra Fadnavis And Ajit Pawar FriendshipSaam TV
Published On

सुशांत सावंत

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे दोन्ही नेते राजकीय विरोधक असले तरी, दोघांची मैत्री राजकारणात सर्वांनाच माहिती आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मलबार हिल येथील देवगिरी बंगला हा अजित पवार यांनाच देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री पुन्हा एकदा समोर आली आहे. (Devendra Fadnavis Ajit Pawar Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहवा यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली होती. त्यानंतर आज, मंगळवारी राज्य सरकारने देवगिरी बंगला अजित पवार यांना मिळणार असल्याचे शासकीय परीपत्रक काढण्यात आलं आहे. या परिपत्रकानुसार देवगिरी हा बंगला आता विरोधी पक्षनेते अजित पवारांना मिळणार आहे. सत्ता गेल्यानंतर अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते झाले. मात्र. या निर्णयामुळे अजित पवार हे विरोधी पक्षात असतानाही सरकारकडून आपलं काम काढून घेण्यात किती पटाईत आहे हे पुन्हा दिसून आलं आहे.

याआधीही अनेकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची मैत्री दिसून आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी हा खूप गाजला होता. अजित पवारांच्या आणि फडणवीसांच्या त्या शपथविधीने दोघांची जवळीक ही महाराष्ट्राला दिसली होती. त्यानंतरही अनेकदा दोघेही एकमेकांची स्तुती करताना दिसत असतात. यानिमित्ताने दोघांची मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Devendra Fadnavis And Ajit Pawar Friendship
Shinde Fadnavis Government : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला!

राजकारण म्हटलं की विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नेहमी संघर्ष दिसून येतो. मात्र, राजकारणात काही असेही नेते असतात ज्यांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची असते. ज्याप्रमाणे भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि कॉंग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांची मैत्री प्रसिद्ध होती. पक्षनिष्ठा जपत आपली मैत्रिही जपणारे नेते राज्याच्या राजकारणात होऊन गेले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com