Shivsena Eknath Shinde Latest News
Shivsena Eknath Shinde Latest News Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! एकनाथ शिंदे अनेक आमदारांसह गुजरातमध्ये; भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे. आज (मंगळवारी) दुपारी १ वाजेनंतर शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असंही बोललं जातंय. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी ढवळाढवळ सुरू झाली आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदे पक्षावर नाराज

एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. आता मात्र मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर काल संध्याकाळपासून शिवसेनेचे १७ आमदार कोणाच्याही संपर्कात नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नाराज

भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपा १२३ मतं मिळाली होती. मात्र विधान परिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतंय. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा आहे. हे. आज (मंगळवारी) दुपारी १ वाजेनंतर शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असंही बोललं जातंय. (Shivsena in MLC Election 2022)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT