Devendra Fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

'हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदावर बसण्याची तयारी आहे का?'

हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का, असा सवाल दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या तीसहून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना नेते, खासदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना कोणता झेंडा हाती घेऊ असा प्रश्न पडला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट भाजपसोबत युती करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचदरम्यान शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं आहे. हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का, असा सवाल दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ट्विट करत फडणवीसांना केला आहे. ( Maharashtra Political Crisis In Marathi)

एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी त्यादरम्यान कोणी समोर येऊन सांगितल्यास राजीनामा देतो, असं ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं होत. तसेच मुख्यमंत्र्यांनी शासकीय वर्षा निवासस्थान देखील सोडले.

त्यावेळी शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवली. तसेच त्यावेळी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद देखील उपस्थित होत्या. त्याच सय्यद यांनी सध्याच्या राजकीय घडमोडीवर भाष्य केलं आहे. 'हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का? भाजपचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी? भाजपाने या प्रश्नाचे उत्तर दिल्यास सर्व सत्य असत्य बाहेर येईल', अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले आहे.

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? : दीपाली सय्यद

शिवसेना नेते (ShivSena) आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. शिंदे यांच्या बंडानं शिवसेनेत आता दोन गट पडले आहेत. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड करताना आमचा गट म्हणजे खरी शिवसेना असं म्हटलं आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी एक ट्वीट केलं आहे. “एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) मला शिकवण दिली”, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT