'एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी शिकवण दिली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?'

शिंदे यांच्या बंडानं शिवसेनेत आता दोन गट पडले आहेत.
Deepali Sayyad, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Deepali Sayyad, Uddhav Thackeray, Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई : शिवसेना नेते (ShivSena) आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. शिंदे यांच्या बंडानं शिवसेनेत आता दोन गट पडले आहेत. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड करताना आमचा गट म्हणजे खरी शिवसेना असं म्हटलं आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच अभिनेत्या आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी एक ट्वीट केलं आहे. “एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) मला शिकवण दिली”, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. (Deepali Sayyad Latest News)

Deepali Sayyad, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Jayant Patil : गुवाहाटीत गेलेले काही आमदार गुप्तहेर? जयंत पाटील काय म्हणाले? वाचा...

“सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरेसाहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू”, अशा स्वरुपाचं ट्विट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

बुधवारी (22 जून) सुद्धा राज्यातील राजकीय परिस्थितीवर दीपाली सय्यद यांनी ट्विट केलं होतं. “माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल”, असं दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेत फुट सुरूच आहे. शिवसेनेला लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. एकीकडे शिवसेनेकडून या आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे 10 हून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

Deepali Sayyad, Uddhav Thackeray, Eknath Shinde
...तर उद्धव ठाकरेंना पक्षासाठी नवीन चिन्ह शोधावं लागेल; घटनातज्ज्ञ काय म्हणाले पाहा

इतकंच नाही तर, आता एकनाथ शिंदे शिवसेनेला सर्वात मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीसाठी शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहेत. अशातच धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं तर, उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक लढवण्यासाठी दुसरे चिन्ह शोधावं लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com