...तर उद्धव ठाकरेंना पक्षासाठी नवीन चिन्ह शोधावं लागेल; घटनातज्ज्ञ काय म्हणाले पाहा

धनुष्यबाणाचं चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे करणार अर्ज
Uddhav thackeray News, Shivsena Latest News in Marathi, Eknath Shinde News
Uddhav thackeray News, Shivsena Latest News in Marathi, Eknath Shinde NewsSaam Tv

मुंबई: शिवसेनेतून (ShivSena) बंड केल्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेला सर्वात मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीसाठी शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह (ShivSena Official Symbol Of Arrow) आपल्याला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहेत. अशातच धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं तर, उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या गटाला निवडणूक लढवण्यासाठी दुसरे चिन्ह शोधावं लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र खरंच एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळेल का? याबाबत घटनातज्ज्ञांनी आपलं मत मांडलं आहे. (Shivsena Latest News)

Uddhav thackeray News, Shivsena Latest News in Marathi, Eknath Shinde News
सर्वात मोठी बातमी! आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही फुटणार? सूत्रांची माहिती

सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार नेले. आता पक्षाचं चिन्ह सुद्धा काबीज करता येईल का? याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना उल्हास बापट म्हणाले की, "37 हा मॅजिक नंबर आहे, आणि 37 इतका आकडा त्यांच्याजवळ असेल तर, तो गट बाहेर पडून शकतो. त्याला शिवसेना म्हटलं जातं. राज्यघटनेचं पक्षांतर कायद्याचं 10 वं शेडूल्ड प्रमाणे जर दोन तृतीअंश लोकं पक्षातून बाहेर पडली तर तो पक्ष समजाला जातो आणि उरलेला एक तृतीयांश गट धरला जातो. तेव्हा जर का बाहेर पडलेला गट हे सिद्ध करू शकला तर निवडणूक आयोग त्याचा विचार करू शकतं". असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. (Eknath Shinde Latest News)

Uddhav thackeray News, Shivsena Latest News in Marathi, Eknath Shinde News
Eknath Shinde News : एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर? राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदे, केंद्रात ३ मंत्रिपदांची शक्यता

पुढे बोलताना उल्हास बापट म्हणाले की, "हे सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाला असतात. याचा दुसरा अधिकार कुणाकडे होत नाही. तेव्हा या गटाला निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. जर निवडणूक आयोगाला पटलं की, 37 पेक्षा अधिक उमेदवार आहेत तर त्यात ते निर्णय घेऊ शकतात. मात्र असं असलं तरी, निवडणूक आयोग सर्व 37 उमेदवारांची पडताळणी करतं की, कोणताही उमेदवार दबावात तर नाहीत ना". असं उल्हास बापट यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी सांगितलं की, आधी एकनाथ शिंदेंचा गट स्थापन झाला पाहिजे, त्यानंतर त्यांचा दोन तृतीयांश बहुमताचा गट स्थापन केला पाहिजे मग त्या गटाची अधिकृत नोंद झाली पाहिजे आणि मग त्यानंतरच ते शिवसेनेवर आपला पक्ष म्हणून दावा करु शकतात आणि धनुष्यबाणावर दावा करू शकतात असं असिम सरोदे म्हणाले आहेत. (Can Uddhav Thackeray will have to find a new Electoral symbol for the shivsena)

Uddhav thackeray News, Shivsena Latest News in Marathi, Eknath Shinde News
ईडीच्या भीतीने आमदार पळाले; यामागे भाजपचंच कारस्थान; संजय राऊतांचा थेट आरोप

असिम सरोदे पुढे म्हणाले की, जर एकनाथ शिंदेंचा दोन तृतीयांश बहुमताचा अधिकृत गट स्थापन झाला की आपोआप त्यांच्या गटाला मान्याता मिळेल. त्यानंतर बहुमत असलेला गट म्हणजे खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे करु निवडणूक आयोगाकडे करू शकतात. कायद्यामध्ये सर्वांच म्हणणं ऐकून घेण्याचं तत्व पार पाडलं जातं. त्यामुळे निवडणूक आयोग दोन्ही गटांचं म्हणणं ऐकून घेऊन मगच त्यावर निर्णय देईल असं कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com