Ambadas Danve Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांना पसंती देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांना पसंती देण्यात आली आहे. शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी उमेदवारी दिली होती. या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषद अध्यक्षांना पत्र लिहिले होते.

गेल्या महिन्यात शिवसेनेच्या (ShivSena) आमदार मनीषा कायंदे, सचिन अहिर, अंबादास दानवे, विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांच्या शिष्टमंडळाने विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपद आणि मुख्य सचेतक पदाबाबतचे पत्र दिले होते.

८ जुलैपर्यंत, ७८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधान परिषदेत भाजप २४, शिवसेनेचे १२ आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रत्येकी १० सदस्य आहेत. चार अपक्ष, तर विधान परिषदेच्या १५ जागा रिक्त आहेत. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते झाले आहेत. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकाच पक्षाचे पण विधानपरिषदेत वेगवेगळे गट असल्याचे दुर्मिळ उदाहरण ठरणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आहेत.

विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसनेही दावा केला होता. पण विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ कमी असल्यामुळे हे पद शिवसेनेकडे गेले आहे. तर दुसरीकडे या अगोदर राष्ट्रवादीनेही दावा केला केला होता.

तब्बल ३९ दिवसांनंतर शिंदे सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. पहिल्या टप्प्यात आज भाजप आणि शिंदे गटातील एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या नावे खालीलप्रमाणे -

भाजपकडून कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ

गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा.

शिंदे गटाकडून कुणी घेतली शपथ

तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संजय राठोड, गुलाबराव पाटील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT