Shivsena Dasara Melava Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : 'एक नेता, एक झेंडा, एक मैदान...', शिंदे गटापाठोपाठ ठाकरे गटाचाही टीझर रिलीज

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून टिझर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याची तारीख जशीजशी जवळ येत आहे, तसतशी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये चुरस वाढताना दिसत आहे. दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) दोन्ही गटांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून टिझर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा टिझर गुरूवारी प्रदर्शित करण्यात आला होता. आता उद्धव ठाकरे यांच्या गटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Shivsena Dasara Melava Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे गटाच्या टीझरमध्ये काय आहे?

उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटाच्या टिझरला तोडीस तोड देणारा नवा टीझर बनवला आहे. या टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फोकस ठेवण्यात आला असून जुन्या दसऱ्या मेळाव्याची क्षणचित्रेही या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. ठाकरे गटाचा हा टीझर अवघ्या 35 सेकंदाचा आहे. (Latest Marathi News)

टीझरच्या सुरूवातीलाच भगवे झेंडे आणि शिवसेनेच्या वाघाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. या शिवाय जुन्या दसऱ्या मेळाव्याची प्रचंड गर्दी या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!, असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. (Maharashtra News)

शिंदे गटाच्या टीझर कसा आहे?

"एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ" म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज झाला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे.

टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : गावी परतताना काळाचा घाला; बसची मोटारसायकलला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

देवाभाऊंच्या 'त्या' जाहिरातींवर तब्बल 40 ते 50 कोटी खर्च; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

Dhamaal 4: अजय देवदान, रितेश देशमुख, अर्शद वारसी पुन्हा येणार 'धमाल' करायला; या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Maharashtra Live News Update: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मर्दानी खेळाची परदेशी रंगत

Asia Cup 2025: आशिया कपआधी भारताला मोठा धक्का, महत्वाच्या खेळाडूला दुखापत; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT