cm Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde Tweet : "मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे...", एकनाथ शिंदेंचं ट्वीट चर्चेत

आम्हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असल्याचं सांगण्याना त्यांनी प्रयत्न केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरले आहेत. दोन्ही गटातील नेतेमंडळी कार्यकर्त्यांसह हळूहळू शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे पोहोचत आहेत. दसरा मेळाव्याला (Dasara Melava) पोहोचण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून आम्हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असल्याचं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हरिवंश राय यांची ओळ शेअर केली आहे. "मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे", असं ट्वीट एकनाश शिंदे यांनी केलं आहे.

शिवसेना बाळासाहेबांचे विचार हा रक्ताचा वारसा नाही. केवळ बाळासाहेबांचा मुलगा म्हणून शिवसेनेवर हक्क गाजवता येणार नाही. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे त्यांना केली आहे.

काही तासांपूर्वी केलेल्या ट्वीटमध्य एकनाथ शिंदेंनी, विकासाच्या यात्रेत देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी बाळासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत असं म्हटलं होतं. त्यामुळे केवळ रक्ताचं नातं आहे म्हणून शिवसेना तुमची असं होत नाही तर आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत म्हणून आम्हीच खरी शिवसेना आहोत, असं या ट्वीटच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

कसा असेल कार्यक्रम?

>> 5.30 वाजता नंदेश उमप यांच्या कार्यक्रमने होणार सुरुवात.

>> 6.30 वाजता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या भाषणाला सुरुवात.

>> 7.25 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळावा ठिकाणी येताच 111 साधूंकडून शंख नाद केला जाणार.

>> मुख्यमंत्री शिंदे यांना अयोध्या येथून आलेल्या साधूंकडून चांदीच धनुष्य आणि गदा दिली जाईल. यापुढे आता हिंदुची धुरा तुम्ही सांभाळा असे आशीर्वाद दिले जातील.

>> त्यानंतर 40 आमदार 12 खासदार यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला जाईल.

>> 8.15 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु होईल. साधारण 1 तास भाषाण चालणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT