Shivsena Dasara Melava: शिंदे गटाकडे एवढा पैसा कसा आला? उद्या गौप्यस्फोट करणार; खैरेंचा दावा

शिंदे गटाकडे करोडो रुपये आहेत, म्हणूनच ते पैसे खर्च केले जात आहेत, मेळाव्यासाठी 52 कोटी खर्च केले - खैरे
Chandrakant Khaire Vs Eknath Shinde
Chandrakant Khaire Vs Eknath ShindeSaam TV
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जात असून हा पैसा कोठून आला? याबाबत आपण मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी समा टीव्हीशी बोलताना केला आहे.

आज होणाऱ्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava) गर्दी जमा करण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. तर शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून एसटी बसेससह (ST Bus) खाजगी बसमधून कार्यकर्ते आणण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटाकडून राज्यभरातून एसटी आरक्षित करण्यात आल्या असून यासाठी महामंडळाला तब्बल १० कोटी रुपये दिल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ -

याच सर्व पार्श्वभूमीवरुन चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका करत आपण एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. खैरे म्हणाले, शिवाजी पार्कवरील मेळावा हाच खरा दसरा मेळावा आहे.

बाळासाहेबांनी म्हटलं होत कि, उद्धवाला सांभाळा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शिंदे गटाकडे करोडो रुपये आहेत, म्हणूनच ते पैसे खर्च केले जात आहेत. मेळाव्यासाठी 52 कोटी खर्च केले हे पैसे कोठून आले, याची आपण माहिती घेत पुरावे गोळा करत आहे. शिवाय दोन दिवसात संभाजीनगरमध्ये तक्रार दाखल करू हा सर्व प्रकार उघड करणार असल्याचा इशाराच खैरे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

मेळाव्यासाठी झालेल्या संपुर्ण खर्चाची ईडी चौकशी करा -

Chandrakant Khaire Vs Eknath Shinde
Pankaja Munde : मी संघर्ष कन्या, मी कुणासमोर झुकणार नाही; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने एसटी महामंडळाला १० कोटी रुपये रोख भरल्याचा आरोप करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिंदे गटाने मेळाव्यासाठी केलेल्या संपूर्ण खर्चाची ईडी व आयकर विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com