Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News  Saam TV
मुंबई/पुणे

Mashayuti Coordinating Committee : महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन, प्रत्येकी ४ सदस्यांचा समावेश

Political News : शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रत्येकी ४ सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज मसुरकर

Mumbai News :  अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांसोबत जवळपासल ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहेत. मात्र युतीत राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिवसेनेच्या आमादारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

त्यावरुन दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. मात्र अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी आणि इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आता महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येकी ४ सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. एकूण १२ सदस्य समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे,चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, आशिष शेलार यांचा समावेश असेल.

तर शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे समितीत चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असतील. (Political News)

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकीत समन्वय समिती आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाली. उद्यापर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार, आगामी अधिवेशन काळात पुरवण्या मागण्या संदर्भात देखील चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे, त्यामुळे जे नाराज आहेत त्यांची समजूत कशाप्रकारे काढायची यावरही बैठकीत चर्चा झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT