Vivek Patil Retired From Politics : २० वर्षे आमदार, २ वर्षांपासून तुरुंगात; शेकाप नेते विवेक पाटील यांचा राजकारणातून संन्यास

Shetkari Kamgar party leader vivek patil announcement retirement : शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी राजकारणातून 'संन्यास' घेतला आहे.
vivek patil announcement retirement
vivek patil announcement retirementSAAM TV
Published On

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Shetkari Kamgar party leader vivek patil announcement retirement : शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी राजकारणातून 'संन्यास' घेतला आहे. वय ६९ वर्षे असून, प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली.

मी १९७९ पासून शेकापचा सक्रिय कार्यकर्ता आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून दिले होते, असे विवेक पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. (Latest News)

vivek patil announcement retirement
Mashayuti Coordinating Committee : महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन, प्रत्येकी ४ सदस्यांचा समावेश

१० वर्षे पनवेल पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. सन १९९५, १९९९, २००४, २००९ असे चार वेळा विधानसभेवर निवडून देऊन २० वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या सर्व कार्यकत्यांचे आणि हितचिंतकांचे मनपूर्वक आभार मानतो, असेही त्यांंनी पत्रात नमूद केले आहे. (Political News)

vivek patil announcement retirement
NCP On Mantrimandal Vistar: खातेवाटपाआधीच अजितदादांची डोकेदुखी वाढली? समर्थक आमदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विवेक पाटील म्हणाले की, तुम्हाला माहीत आहे ४ वर्षांपूर्वी एका जीवघेण्या आजारातून तुम्हा सर्वांच्या सद्भावना व आशीर्वादामुळे मी बरा झालो. आता पुन्हा त्याच आजाराने मी त्रस्त आहे. शारीरिक व्याधीमुळे मला यापुढे काम करणे शक्य होणार नाही. तसेच माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा देत आहे. त्यामुळे मी सक्रीय राजकारणातून निवृत्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com