
सचिन गाड, मुंबई
Bombay High Court Rejects Nawab Malik Plea : मनी लाँड्रिंग प्रकरणात कोठडीत असलेले आणि वैद्यकीय कारणास्तव सध्या रुग्णालयात दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. मलिक यांना जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक (Nawab Malik) सध्या कोठडीत आहेत. वैद्यकीय कारणास्तव सध्या ते रूग्णालयात आहेत. त्यांनी वैद्यकीय कारण देत तात्पुरता जामीन देण्यात यावा, अशी विनंती मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) दाखल याचिकेद्वारे केली होती. मात्र, हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
जामीन अर्जात मलिकांनी काय म्हटलंय?
वैद्यकीय कारणास्तव मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल करणाऱ्या नवाब मलिक यांना दिलासा मिळू शकलं नाही. एक किडनी निकामी झाली असून, दुसरी किडनी केवळ ६० टक्के काम करत असून, ती सुद्धा निकामी होत असल्याचे मलिक यांनी जामीन अर्जात केला होता.
मात्र, मलिक यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला होता. अनेक जण एका किडनीवर जगतात. तसेच कोणताही वैद्यकीय अहवाल मलिकांची दुसरी किडनी केवळ ६० टक्के कार्यरत असल्याचे सिद्ध करत नसल्याचा दावाही ईडीने केला होता.
जामीन नाकारताना मुंबई हायकोर्टाने मेरिटच्या आधारे दोन आठवड्यांनी जामीन अर्जावर सुनावणी घेणार असल्याचे म्हटले आहे. नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी २०२२ पासून कोठडीत आहेत. सध्या ते वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.