Angry Shiv Sena workers gather outside a Vikhroli hospital after the death of party worker Chetan Thakur during treatment. saam tv
मुंबई/पुणे

शिवसेनेच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू; संशय आल्याने राऊत रुग्णालयात धडकले, राजकीय वर्तुळात खळबळ

Shiv Sena Worker Death During Treatment In Mumbai Hospital: मुंबईतील विक्रोळीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयावर हलगर्जीपणाचे आरोप होत असून आमदार सुनील राऊत यांनी कारवाईची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई: विक्रोळीमध्ये ठाकरे गटाच्या एका शिवसैनिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेतन ठाकूर असे या मृत शिवसैनिकाचे नाव असून रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. चेतन ठाकूर हे विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात वास्तव्यास होते. काल रात्री त्यांना ताप आल्याने त्यांना उपचारासाठी आदी आरोग्य या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाचत्यांचा मृत्यू झाला. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर हलगर्जीपणाचे आरोप केले आहेत.

घटनेनंतर संतप्त नातेवाईक, मित्रमंडळी तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. संबधित रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, आमदार सुनील राऊत यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या रुग्णालयात वारंवार अशा घटना घडत आहेत. गेल्या वर्षी दहीहंडीच्या वेळी पडलेल्या एका तरुणाला पालिका रुग्णालयाने मृत घोषित केले होते. मात्र या खासगी रुग्णालयाने त्याच्यावर उपचार सुरू ठेवल्याचा आणि काही दिवसांनी लाखोंचे बिल करून मृत घोषित केल्याचा आरोप आहे, असे राऊत यांनी सांगितले.

तसेच संबंधित रुग्णालय पालिकेच्या ताब्यात देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले असून कोणतीही हलगर्जीपणा झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रुग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar: पोहण्यासाठी तलावात उडी मारली, परत बाहेर आलाच नाही; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाणं टाळावं, नाहीतर होईल फूड पॉयझनिंग

Tandoori Roti Recipe: रोज भाजीसोबत चपाती खाऊन कंटाळा आलायं? मग तव्यावर बनवा हॉटेलसारखी तंदुरी रोटी; वाचा रेसिपी

पावसाळ्यात चहासोबत बनवा हॉटेल स्टाईल क्रिस्पी ओनियन रिंग्स, सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भाईंदरमध्ये झाड कोसळून तरुणाचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

SCROLL FOR NEXT