Umesh Borgavkar Shiv Sena Shinde group news  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

Attack on ex-Shiv Sena corporator in Kalyan : कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात बोरगावकर आणि त्यांचे सहकारी जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी

Umesh Borgavkar Shiv Sena Shinde group news : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे. शिवसेना कार्यालयासमोर भांडण सोडवून जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना अज्ञात व्यक्तींकडून हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर गंभीर जखमी झाले आहेत. बोरगावकर यांच्यासोबत ज्ञानेश्वर सपाट ,ओंकार सपाट यांनाही जबर मार लागला आहे. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. (Kalyan political violence latest update)

कल्याणमधील शिवसेना कार्यलयाबाहेर वाद झाला होता. हा वाद सोडवल्यानंतर जखमी व्यक्तीला उमेश बोरगावकर रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्याचे समजतेय. या हल्ल्यामध्ये उमेश बोरगावकर यांना दुखापत झाली आहे. उमेश बोरगावकर यांच्यासोबत असणारे शिवसेना कार्यकर्ते ज्ञानेश्वर सपाट ,ओंकार सपाट यांनाही मारहाण झाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू करण्यात येत आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

उमेश बोरगावकर यांच्या कारवर हल्लेखोराने मोठे मोठे दगड फेकून मारले. यामुळे कारच्या काचेच्या खिडक्या आणि मागील बाजू पुर्णपणे चक्काचूर झाली आहे. कारमधील सीटवरती सर्व काचा पसरल्या आहेत. मोठे दगडही सीटवरती पडल्याचं दिसून येत आहे.

माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे. हा हल्ला का केला होता? याचा तपास पोलिसांकडून घेण्यात येत आहे. उमेश बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट ,ओंकार सपाट यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. हल्ला झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. त्याशिवाय हा हल्ला जुन्या वादातून झाला का? या हल्ल्यामध्ये काही राजकीय कनेक्शन आहे का? याचा तपास महत्मा फुले पोलिसांकडून करण्यात येत आहे.

माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह कार्यकर्ते ज्ञानेश्वर सपाट ,ओंकार सपाट यांच्यावर मध्यरात्री हल्ला झाल्याची बातमी कल्याणमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. कल्याणमधील शिवसैनिंकी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. हल्लेखोराला तात्काळ अटक करण्याची मागणीही शिवसेनेकडून कऱण्यात आली आहे. कल्याणमध्ये शिवसेना नेत्यांकडून या हल्ल्याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महात्मा फुले पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तपास सुरू केलाय. खास पथक नेमलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT