Uddhav Thackeray Eknath Shinde News  Saam Tv
मुंबई/पुणे

Thackeray vs Shinde : लोकसभेच्या निकालात काहीतरी गडबड, शिवसेना ठाकरे गटाला संशय; शिंदेंच्या विजयी उमेदवारावर आक्षेप

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीत काहीतरी गडबड झाली, असा संशय शिवसेना ठाकरे गटाला आहे.

Satish Daud

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा धक्कादायक निकाल लागला. शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर जवळपास २ हजार मतांनी पराभूत झाले होते. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, फेर मतमोजणीनंतर रवींद्र वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. आता या विजयावर ठाकरे गट आक्षेप घेणार असल्याची माहिती आहे.

या निकालामध्ये काहीतरी मोठी गडबड झाल्याचा ठाकरे गटाला संशय आहे. त्यामुळे या निकालाला ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी कायदेशीर सल्ला देखील घेतला जात आहे. या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे.

त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. जर राष्ट्रपतींनी ठाकरे गटाची मागणी मान्य केली, तर महायुतीची आणखी एक जागा कमी होऊ शकते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत अमोल कीर्तीकर आघाडीवर होते.

शेवटच्या फेरीत त्यांनी रवींद्र वायकर यांच्यावर विजय मिळवला. मात्र, वायकर यांनी या विजयावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर पुन्हा मतमोजणी केली असता, वायकर यांचा ४८ मताधिक्याने विजय झाला. अमोल गजानन किर्तीकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली.

तर रवींद्र वायकर यांना ४ लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली. अटीतटीच्या या निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. रवींद्र वायकर यांच्या विजयावर ठाकरे गट आक्षेप घेणार असल्याची माहिती आहे. यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला देखील घेतला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT