Uddhav Thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

Political News: सुषमा अंधारे प्रकरणाचे मुंबईत पडसाद? ठाकरे गटाच्या नियोजित बैठकांना ब्रेक

Political News: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील अंतर्गत मतभेद बीडमध्ये समोर आले आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाची सभा बीडमध्ये होत आहे, त्याआधीच ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

बीडमधील घटनेनंतर ठाकरे गटाने सावध भूमिका घेत पक्षाच्या मातोश्रीवर सुरू असलेल्या लोकसभानिहाय आढावा बैठकांना अचानक ब्रेक लावल्याची चर्चा आहे. आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.

याशिवाय ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबाबतही साशंकता उपस्थित होत आहे. काल सुरू झालेल्या विभागनिहाय बैठकांना दुसऱ्याच दिवशी ब्रेक लागल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुषमा अंधारे प्रकरणाचा बैठकांवर परिणाम झाल्याची चर्चाही रंगू लागली आहे. (Political News)

बीडमध्ये काय घडलं?

बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओ जारी करत सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुषमा अंधारे पैसे घेऊन पद वाटप करत आहेत. यासह अनेक गंभीर आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून आप्पासाहेब जाधव यांनी केले होते.

यामुळेच मी त्यांना दोन चापटा लावल्या असा दावा त्यांनी व्हिडिओमध्ये केला होता. या दाव्यानंतर आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa Prasad: गुढीपाडव्याला बनवा कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद; आरोग्याला आहे फायदेशीर

Maharashtra Live News Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

असिड हल्ल्याने महाराष्ट्र हादरला...? सहावीतल्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला

Air Cooler: ३ पातींचा की ५ पातींचा कूलर विकत घेणं योग्य? खरेदीआधी वाचा ही माहिती

मुंबई, नाशिक अन् पुण्याला रेल्वेचं मोठं गिफ्ट... वाचा काय काय फायदा होणार?

SCROLL FOR NEXT