Maharashtra Lok Sabha Election 2024  Yandex
मुंबई/पुणे

Ravindra Waikar : रविंद्र वायकर यांचा विजय मॅनेज, मतमोजणीत हेराफेरीचा आरोप; पोलिसांत तक्रार दाखल

Ravindra Waikar win was Managed: शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा ४८ मतांनी झालेला विजय हा मॅनेज असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी निवडून आले. अटीतटीच्या लढतीत त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. निकालात मोठी हेराफेरी झाली असून मतमोजणीदरम्यान गैरप्रकार झाला असा, आरोप ठाकरे गटाने केला होता. यानंतर दोन अपक्ष उमेदवारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हिंदू समाज पक्षाचे भरत शाह आणि भारत जनआधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणी ८ दिवस उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याबाबतची नाराजी तक्रारदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात पार पडली. मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असताना रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंदरकर आणि मुलगी दीप्ती यांच्याकडून मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याचे शहा आणि आरोरा यांच्या लक्षात आलं.

त्यांनी या दोघांनाही मोबाईल वापरण्यापासून रोखले. तसेच ही बाब आरओ वंदना सूर्यवंशी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. मात्र, त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितल्यानंतर शहा आणि आरोरा या दोघांनी वाईकर यांच्या मेव्हण्याला वनराई पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

मात्र, त्या ठिकाणी पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल न करता फक्त तक्रार दाखल करून घेतली. याबाबत अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांनी आपला अहवाल पोलिसांकडे पाठवला नाही, असा आरोपही तक्रारदार यांनी केला. निवडणुकीत अमोल कीर्तीकर यांचाच विजय झाला होता. पण हा विजय शिंदे गटाने ढापला, अशी टीकाही तक्रारदार यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT