Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

सुरतमध्ये बंडखोर आमदारांना गुंडांकडून मारहाण; शिवसेनेचा गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मंत्री एकनाथ शिंदे १७ आमदारांसह गुजरातमध्ये गेले आहेत. गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 'शिवसेनेच्या आमदारांना सुरतमध्ये गुंडांच्या मार्फत मारहाण झाल्याचा आरोप, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. (Political crisis in Maharashtra)

संजय राऊत म्हणाले, आम्ही सुरतला जाणारे शिवसैनिक नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमचे सहकारी आहेत. आम्ही अजुनही त्यांची वाट पाहत आहे. मला विश्वासही आहे ते परत येतील. आमदारांना सुरतमधून इकडे यायच आहे, पण त्यांना मारहाण होत आहे, हे चुकीचे आहे. एकनाथ शिंदेंनी प्रेमाने परत यावे. शिवसेनेच्या आमदारांच्या संरक्षणासाठी मुंबईतील गुंड सुरतमध्ये बसले आहेत. आमच्या आमदारांचे संरक्षण करावे एवढी वाईट वेळ आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांच्या स्वाभिमानाला धक्का लागला आहे.

विधान सभेत जेव्हा वेळ येईल तेव्हा आमदारांची संख्या मोजा, पूर्ण बहूमत सिद्ध होईल. एकनाथ शिंदे आमचे सर्वकाही आहेत, ते परत येतील असा आमचा विश्वास आहे. सुरतला आमदारांना मारहाण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यात लक्ष घालावे. आमचे मंत्री भाजपसोबत होते, तेव्हा त्यांच्याकडे कोणती खाती होती, आता महाविकास आघाडीमध्ये चांगली खाती मिळाली आहेत, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

शिवसेनेने (Shivsena) एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेच्या (shivsena) सुमारे 17 आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. (Eknath Shinde Marathi news)

दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील (Gujarat BJP chief C R Patil) यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT