शिवसेनेला दुसरा मोठा झटका; पक्षाचा संकटमोचक ईडीच्या रडारवर

दुसरीकडे शिवसेना नेते, मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडीकडून ९ तासापासून चौकशी सुरू आहे. यामुळे शिवसेनेची दुहेरी कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे
uddhav Thackeray
uddhav Thackeray saam Tv
Published On

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्याचे राजकारण सकाळपासून ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना आमदाराच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते, मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडीकडून ९ तासापासून चौकशी सुरू आहे. यामुळे शिवसेनेची दुहेरी कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ( Anil Parab News In Marathi )

uddhav Thackeray
आमदार पतीला शोधण्यासाठी पत्नीची सूरतकडे कूच; पतीसोबत विपरीत घडल्याचा संशय

परिवहन मंत्री अनिल परब यांना काल ईडीने दुसऱ्यांदा नोटीस धाडली. याआधी देखील अनिल परब यांना ईडीने समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी परब नियोजित कार्यक्रमामुळे शिर्डी येथे होते. मात्र, ईडीने दुसऱ्यांदा समन्स जारी केल्यानंतर परब आज ईडी कार्यालयात हजर झाले. परब ईडी कार्यलयात हजर होताच ईडी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. तब्बल ९ तास झाले तरीही परब यांची ईडी कार्यलयात चौकशी सुरू आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणी वाढल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.दापोली रिसोर्ट प्रकरणी ही ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधी परब यांच्या निकटवर्तीयांचीही चौकशी करण्यात आली होती

एकनाथ शिंदे आणि ३२ बंडखोर शिवसेना आमदार त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पक्ष अडचणीत असताना संकट मोचकासारखे धावून जाणारे मंत्री अनिल परब यांच्याही अडचणी वाढताना पाहायला मिळत आहे. ईडीकडून तब्बल ९ तासांपासून परब यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना दुहेरी कोंडीत अडकली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे आणि काही शिवसेना आमदारांनी बंड केले आहे. तर दुसरीकडे परब ईडीच्या रडारवर आहे.

uddhav Thackeray
Pankaja Munde यांना मुख्यमंत्री करा; भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी

एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून जाणार नाही : शिवसैनिक

शिवसेना वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सकाळपासून हा सर्व प्रकार सुरू असताना आनंद मठात मात्र शांततेचं वातावरण आहे. या कार्यालयात शिवसैनिक आहेत. मात्र घडलेल्या प्रकारावर त्यांच्या विश्वास बसत नाही. एकनाथ शिंदे शिवसेना सोडून कुठं जाणार नाहीत अशी चर्चा सैनिकांमध्ये आहे .शिवसैनिक आपल्या मोबाईल मध्ये या बाबतचे अपडेट्स पाहत आहेत. मात्र कुणीही कॅमेरा समोर बोलण्यास तयार नाही. एकूणच शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com