Pankaja Munde यांना मुख्यमंत्री करा; भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी

पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्या असा सूर भाजप कार्यकर्त्यांनी भर सभेत काढला
Pankaja Munde
Pankaja Munde Saam Tv

बीड : एकीकडे शिवसेना (Shivsena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले असतानाच, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे पुन्हा पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्या असा सूर भाजप कार्यकर्त्यांनी भर सभेत काढला आहे. (Pankaja Munde Latest News)

Pankaja Munde
ना प्रतिक्रिया, ना ट्विट, देवेंद्र फडणवीस नेमके आहेत कुठे? राजकीय वर्तुळात चर्चा

बीडच्या आष्टी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर पंकजाताई भावी मुख्यमंत्री.. पंकजाताईला मुख्यमंत्री करा...अशा घोषणा दिल्या त्यावेळी पंकजा मुंडे खळखळून हसल्या आहेत.

यावेळी कार्यकर्त्यांच्या अपेक्षामुळे माझी डोकेदुखी होते आहे, असे म्हणत त्यांनी भाषणातून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री पदावरून प्रतिउत्तर दिले. तुमच्या अशा कृत्यामुळे माझ्या डोक्याला ताप होतो. अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी कार्यकर्त्यांमधून प्रचंड उत्साह, घोषणाबाजी अन गदारोळ पाहायला मिळाला. (Eknath Shinde Latest News)

Pankaja Munde
Eknath Shinde : बंड का केलं? एकनाथ शिंदेंनी रश्मी ठाकरेंना सांगितली ३ कारणं

एकीकडे गुजरातच्या सुरतमध्ये महाराष्ट्र सरकार बदलासाठी जोरदार हालचाली सुरू असताना, बीडमध्ये मात्र भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात पंकजा मुंडे ह्या राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात. असा सूर निघाल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरुद्ध पंकजा मुंडे यांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर येतो की काय ? हाच मोठा प्रश्न समोर येत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com