Shiv Sena MLA Disqualification Hearing Big Twist Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Rahul Narvekar Maharashtra Politics Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाकरेंचा एक पुरावा अन् शिंदे गट बॅकफूटवर, आमदार अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट; नेमकं काय घडलं?

Shiv Sena MLA Disqualification Case: ठाकरे गटाने ऐनवेळी हुकमी अस्त्र बाहेर काढत खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे शिंदे गट बॅकफूटवर गेला आहे.

Satish Daud

Shiv Sena MLA Disqualification Hearing Update

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला जात आहे. अशातच सुनावणीत मोठा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाने ऐनवेळी हुकमी अस्त्र बाहेर काढत खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे शिंदे गट बॅकफूटवर गेला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला वेग दिला आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना देखील राहुल नार्वेकर ओव्हरटाईम करून आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेत असून दोन्ही गटातील आमदारांची उलट तपासणी करीत आहेत.

अपात्रता सुनावणीत नेमकं काय घडलं?

शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी केली. यावेळी लांडे आपलं म्हणणं मांडत असतानाच ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांसमोर एक एक अटेंडन्स शीट सादर केली.

२१ जून २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेनेच्या २३ आमदारांनी सह्या केल्या होत्या.

यामध्ये सध्या शिंदे गटात असलेले आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर यांच्या देखील सह्या आहेत. या अटेंडन्स शीटवरून ठाकरे गटाचे वकील जोरदार युक्तीवाद करत शिंदे गटातील आमदारांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT