Shocking News: पोलीस अधिकाऱ्याने खटका ओढला अन् बंदुकीतून गोळी सुटली; महिला जागेवरच कोसळली, भयानक VIDEO

Uttar Pradesh Crime News: कर्तव्यावर असताना केलेला बेजबाबदारपणा किती महागात पडू शकतो, याचाच प्रत्यय या घटनेतून आला आहे.
firing of police inspector pistol women injured
firing of police inspector pistol women injuredSaam TV
Published On

Uttar Pradesh Crime News:

पासपोर्ट पडताळणीसाठी महिला आपल्या पतीसह पोलीस ठाण्यात गेली. त्याचवेळी पोलीस अधिकारी पिस्तूल साफ करत होता. नकळत बंदुकीचा खटका ओढला गेला. क्षणात गोळी बाहेर निघाली अन् महिलेच्या डोक्यात जाऊन घुसली. १० सेकंदातच महिला जमिनीवर कोसळली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशात घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

firing of police inspector pistol women injured
World Most Popular Leader: पंतप्रधान मोदींचा जगभरात डंका, ठरले सर्वात लोकप्रिय नेते; दुसऱ्या क्रमांकावर कोण?

या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. डोक्यात गोळी लागल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कर्तव्यावर असताना केलेला बेजबाबदारपणा किती महागात पडू शकतो, याचाच प्रत्यय या घटनेतून आला आहे.

इशरत जहाँ (वय ५५ वर्ष) असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इशरत आणि तिचा पती शकील कामानिमित्त दुबईला जाणार होते. गुरूवारी सायंकाळी पासपोर्ट पडताळणीसाठी ते कोतवाली नगरच्या भुजपुरा पोलीस ठाण्यात गेले.

महिलेसह तिचा पती पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस निरीक्षण कुमार शर्मा उपस्थित होते. ते बंदूक साफ करीत होते. दरम्यान, पिस्तूल साफ करताना अचानक त्यांच्या हातून खटका ओढला गेला. काही क्षणातच बंदुकीतून गोळी सुटली.

ही गोळी थेट महिलेच्या डोक्यात लागली. गोळी लागताच महिला धाडकन जमिनीवर कोसळली. फायरिंगचा आवाज ऐकल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच धावपळ सुरु झाली होती. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

firing of police inspector pistol women injured
Team India: हार्दिक पंड्याचा पत्ता कट? रोहित पुन्हा बनणार टी-२० संघाचा कर्णधार; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com