Sushma Andhare Offerd Sudhir Mungantiwar  Saam Tv News
मुंबई/पुणे

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

Sushma Andhare Offerd Sudhir Mungantiwar : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांची स्थिती सध्या भाजपमध्ये चांगली नाही, त्यांनी शिवसेनेत यावं असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज तब्बल १९ वर्षांनी एकत्र व्यासपीठावर आले. आजच्या मेळाव्यातील ठाकरे बंधुंच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. ठाकरे बंधू नेमकी काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान या मेळाव्यानंतर आता त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

दोन्ही ठाकरे एकत्र आले यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो, डोळ्यांचं पारणं फिटलं. १९ वर्ष लागले या कुटुंबाला एकत्र येण्यासाठी, एका फ्रेममध्ये दिसण्यासाठी, हा आनंद राज्याला साजरा करू द्या, अशी प्रतिक्रिया या मेळाव्यावर अंधारे यांनी दिली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार यांची स्थिती सध्या भाजपमध्ये चांगली नाही, त्यांनी शिवसेनेत यावं असं अंधारे यांनी म्हटलं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे आजच्या विजयी मेळाव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'दोन्ही भाऊ एकत्र आले याचा आनंद आहे. मात्र यामुळे महायुतीचाच जास्त फायदा होणार आहे', असा दावा आठवले यांनी केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि तिसरा गट स्थापन होईल, त्याचा माहयुतीला फायदा होईल' असं आठवले यांनी म्हटलं आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

उद्योग मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीही पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. तसेच ठाकरे बंधुंच्या युतीबद्दलही मोठ वक्तव्य केलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, 'जो प्रतिसाद राज ठाकरेंच्या भाषणाला होता, तो दुसऱ्या भाषणाला निम्माही नव्हता. एक भाषण मराठीच्या कल्याणाचं होतं, तर दुसरं भाषण सत्तेसाठी होतं. राज ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण भाषणात कुठेही आम्ही एकत्र येऊ असं म्हटलेलं नाही. आजचा मेळावा मराठीपुरता मर्यादित होता, हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. अजून युती झालेली नाही, अजून बोलणी झालेली नाही, मेळावा झाला म्हणजे युती झाली असं नाही. युत्या आघाड्या जाऊ देत असं राज ठाकरे म्हणाले आहेत', असं उदय सामंत यांनी बोलून दाखवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: KGF सुपरस्टारचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; सिनेसृष्टीवर शोककळा

Maharashtra Municipal Corporation Election : महापालिका निवडणुका कधी होणार? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने थेट तारखा सांगितल्या

Stressful Situation : भरपूर ताण येतो अन् डोके दुखते, मग आजपासूनच करा 'या' गोष्टी

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने साथ सोडली, 'घड्याळ' हाती बांधलं

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

SCROLL FOR NEXT