Eknath Shinde Shiv Sena Minister Meeting Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजित पवारांच्या खात्यावर 'वॉच' ठेवा, त्यांच्याकडे 'इतक्या' कोटींचे दोन निधी; एकनाथ शिंदेंचे मंत्र्यांना आदेश

Eknath Shinde Shiv Sena Minister Meeting : महायुती सरकारच्या तीन घटक पक्षांमध्ये निधी वाटपासंबंधी सातत्यानं धुसफूस सुरू असल्याचं दिसून येतंय. त्यातही शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याविषयी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे.

Prashant Patil

मुंबई : अजित पवार निधी देत नाही असा नाराजीचा सूर लावलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला आहे. 'अजित पवारांच्या खात्याकडे गडगंज निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या', असा आदेश एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती काही खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. त्यामध्ये निधी वाटपावरुन शिंदेंच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

महायुती सरकारच्या तीन घटक पक्षांमध्ये निधी वाटपासंबंधी सातत्यानं धुसफूस सुरू असल्याचं दिसून येतंय. त्यातही शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याविषयी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील निधी वाटपावरुन एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या खात्यावर बारकाईनं लक्ष ठेवा असा थेट आदेशच त्यांनी त्यांच्या पक्षातील मंत्र्यांना दिला. अजित पवारांच्या खात्यात १४-१४ हजार कोटींचे दोन निधी आहेत. त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे.

'हा निधी कुठे वितरीत होत आहे यांची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे', असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 'जे आपल्या हक्काचं आहे ते घेतलंच पाहिजे, असा आदेशच एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिला. त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्यावर शिवसेनेचा डोळा असेल अशा चर्चांना उत आलाय.

दादांच्या पॅनलला घवघवीत यश मिळण्याचे संकेत?

अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यातील निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ‘ब’ वर्ग सभासद प्रतिनिधी या प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. ही निवडणूक स्थानिक साखर कारखान्यापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती पवार कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाचं प्रतीक ठरली आहे. या निवडणुकीमध्ये सुरवातीपासून अजित पवारांनी आघाडी घेतली आहे. ही आघाडी त्यांनी अद्यापही कायम ठेवलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनाला गेलेले तीन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दोघे बेपत्ता

गँगवॉर पेटलं! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या खूनाचा बदला; आरोपीच्या मुलालाच संपवलं, पुण्यात थरार

SCROLL FOR NEXT