मी सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थाची निवडणूक लढवली नाही; शरद पवारांचा अजितदादांना टोला

Malegaon Sakhar Karkhana Election Result : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून येत आहे.
Malegaon Sakhar Karkhana Election Result
Malegaon Sakhar Karkhana Election ResultSaam Tv News
Published On

पुणे (बारामती) : बारामतीधील माळेगाव साखर कारखाना निवडणुकीकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे. यात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचदरम्यान, या निवडणुकीवरून शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली आहे. 'सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, मी माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही', असं शरद पवार म्हणाले. ते बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना बोलले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून येत आहे. त्याचवेळी शरद पवारांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केल्याचं दिसून आलं. 'राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः कारखान्याच्या निवडणुकीत उभे आहेत. आपण आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत, सरकारी पदावर असताना सहकारी संस्थांची निवडणूक निवडणूक लढवली नाही. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल, तर तो विरोधकांना न्याय कसा देईल?' असं शरद पवार म्हणाले.

Malegaon Sakhar Karkhana Election Result
Cabinet Decision: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपदानाला मंजूरी; फडणवीस सरकारच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते.

या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. १०२ पैकी १०१ मतं वैध ठरली आहेत. त्यातील अजित पवारांना ९१ मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे.

Malegaon Sakhar Karkhana Election Result
Cabinet Decision: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपदानाला मंजूरी; फडणवीस सरकारच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com