प्रमोद जगताप, साम टीव्ही
Shiv Sena Eknath Shinde and 16 MLAs Disqualification: शिवसेनेतून बंड केलेल्या शिंदे गटातील आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात विधानसभा अध्यक्ष विलंब करत आहेत. त्यामुळे त्यांना याप्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात दाखल केली. यावर कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवली आहे.
या नोटीशीत आमदार अपात्र प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली? याचे दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे येत्या ३१ जुलैला या प्रकरणातील पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राहुल नार्वेकर यांना १४ जुलै रोजी नोटीस धाडली होती.
त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुप्रीम कोर्टाच्या या नोटीशीला काय उत्तर देतात? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ३१ तारखेला राहुल नार्वेकर हे सुप्रीम कोर्टाकडून वेळ वाढवून घेऊ शकतात. असं झालं तर पुन्हा सुनावणी लांबणीवर पडू शकते.
सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय काही कार्यवाही करणार नाही. विधानसभा अध्यक्षांनी काय कार्यवाही केली याची माहिती घेऊनच सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते, असं मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी मांडलं आहे.
याशिवाय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपावलेला आमदार अपात्रतेचा निर्णय या प्रकरणाला ३ महिने पूर्ण झाले का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असंही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणी ३१ जुलैला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ जुलैकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.