Uddhav Thackeray Mahavikas Aaghadi Metting Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : हे तर खोके सरकार; 'मविआ'च्या बैठकीत ठाकरे काय म्हणाले? वाचा...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकेचा भडिमार केला.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 'महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार हे पाच वर्ष चालले असते. सरकार स्थापन होत असताना हे मला सांगायचे की, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी दगाफटका करेल, पण मला सांगायलाही लाज वाटते की, आमच्याच लोकांनी दगाफटका केला. यांना आम्ही खूप सन्मान दिला, पण त्यांनीच आमचा घात केला, हे खोके सरकार आहे', असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर टीकेचा भडिमार केला.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले. उद्धव ठाकरे दाखल होताच उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरूवात केली होती. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच विधानभवनात आल्याने एक वेगळाच माहोल बनला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर प्रथमच आज विधानभवनात महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीकेचा भडिमार केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या बैठकीत शिंदे गटावर निशाणा साधला. 'जे आपले होते तेच आपले शत्रू झाले, ही परीक्षा आहे. जगभरात संकट असताना सत्ता होती. संकट गेल्यावर सत्ता काढून घेतली. महाविकास आघाडीने मांडलेले तिन्ही अर्थसंकल्प चांगले होते. या काळात आरोग्यसुविधा वाढवल्या. आता सत्तेत नसताना देखील आपण पुढील अडीज वर्षात चांगलं काम करूयात. हे खोके सरकार आहे' असा टोला देखील ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला आहे.

'आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आपण मागे हटणार नाही. मी फार काल अधिवेशनात उपस्थित राहत नाही, कारण इथलं गांभीर्य राहिलेलं नाही. सदनाची परंपरा रसातळाला गेलीय. मागच्या अडीच वर्षात अजित दादांनी आर्थिक विभाग ज्यापद्धतीने सांभाळला ते खरंच कौतुकास्पद आहे' असं म्हणत ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुकही केलं.

'कोरोना काळात जीव वाचवणयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी आम्ही कामं केली नाही असं जर म्हणत असेल तर त्याला अर्थ नाही. १५ आमदारांनाही अनेक ऑफर आल्या पण ते माझ्या सोबत राहिले याचा मला अभिमान आहे. मरण पत्करू पण शरण जाणार नाही. अनेक वर्षे राजकारण केले - पाहिले पण वैयक्तिक संबंध कधी बिघडू दिले नाही. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागणार आहे, त्यावरून लोकशाही की बेबंदशाही हे जगासमोर स्पष्ट होणार आहे'. असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात 8.0°c तापमानाची नोंद

Cyber Crime : महापालिकेच्या नावाने सायबर फसवणूक! फक्त १० रुपये भरताच बँक खात्यातून उडाले लाखो रुपये

Manoj Jarange : जरागेंच्या हत्येचा कट, धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाला बेड्या, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

8th Pay Commission: ६९ लाख पेन्शनधारकांना झटका! मिळणार नाही आठव्या वेतन आयोगाचा लाभ? वाचा सविस्तर

Gajar Halwa Recipe : ना साखर, ना खवा; 10 मिनिटांत बनवा गाजर हलवा, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT