ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानले जाते.
पण काही लोकांसाठी हळदीचे दूध पिणे हानिकारक सुध्दा असू शकते. हळदीचे दूध कोणी पिऊ नये ते जाणून घ्या.
जास्त अॅसिडिटीची समस्या असलेल्या लोकांसाठी हळदीचे दूध हानिकारक ठरु शकते.
तसेच किडनी स्टोन असलेल्या लोकांनी हळदीच्या दूधाचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
हळदीची अॅलर्जी असलेल्या लोकांनी हळदीचे दूध पिऊ नये.
हळदीचे दूध जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
कोणत्याही औषधासोबत हळदीचे दूध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.