Wardha News : शाळेसमोरून अपहरण, धावत्या कारमध्ये बलात्कार; पुलगावातील संतापजनक घटना

13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला.
Wardha Pulgaon Crime News
Wardha Pulgaon Crime NewsSaam Tv

चेतन व्यास, साम टिव्ही

वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला. पीडित मुलगी शाळेत निघाली असताना दोघांनी चाकूचा धाक दाखवून तिचं अपहरण केलं. त्यानंतर धावत्या कारच नराधमांनी तिचे लचके तोडले. या घटनेने मोठी खळबळ उडली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी (Police) दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. (Pulgaon Todays News)

Wardha Pulgaon Crime News
म्हशीसमोर नाचणं तरुणीला पडलं महागात; नक्की काय घडलं? पाहा VIDEO

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील पुलगाव येथील, 13 वर्षीय पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता, आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती कारमध्ये खेचलं.

पीडितेचे अपहरण करताच, नराधमांनी सुसाट वेगाने कार पळवली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. दरम्यान, धावत्या कारमध्येच आरोपी सुमेध याने पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. (Wardha Pulgaon Crime News)

Wardha Pulgaon Crime News
Rat Fights Snake : साप आणि उंदराचं घमासान युद्ध; जिंकलं कोण? पाहा थरारक VIDEO

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पीडिता प्रचंड घारबली. तिने आपल्या आईला घडलेली सर्व घटना सांगितली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच, आईने तातडीने पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि एका मित्राविरुद्ध तक्रार दिली.

तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केलाय.पोलिसांनीही तत्काळ घटनेची दखल घेत आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे. दोन्ही नराधम आरोपी पोलिसांच्या रडारवर असून लवकरच दोघांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com