कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरून शिवसेना-भाजप आमने-सामने प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरून शिवसेना-भाजप आमने-सामने

सध्या राज्यात विविध ठिकाणी भाजपकडून जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. आता याच यात्रेतील गर्दीवरून शिवसेना खासदार आणि भाजप खासदार एकमेकांवर टीका करत आहेत.

प्रदीप भणगे

कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरून शिवसेना-भाजप आमने सामने आले आहेत. जन आशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण, अशी टीका शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली. राऊत यांच्या या टीकेला आता केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (shiv sena and bjp are criticizing to each other because of jan ashirwad yatra)

हे देखील पहा -

सध्या राज्यात विविध ठिकाणी भाजपकडून जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. आता याच यात्रेतील गर्दीवरून आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरून शिवसेना खासदार आणि भाजप खासदार एकमेकांवर टीका करत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रेला आज कल्याण पश्चिमेमधून सुरवात झाली. यात्रेदरम्यान पाटील यांनी पत्रकार यांच्याशी संवाद साधला आणि शिवसेना खा. संजय राऊत यांच्यावर टीका केली. पाटील यांनी सांगितले की, कोरोनाचे सर्व नियम पाळून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेना नेते आणि युवा नेत्यांच्या कार्यक्रमात मास्कही लावलेला नसतो, प्रचंड गर्दी असते. याचा अर्थ शिवसेनेच्या रॅलींमध्ये कोरोना पसरत नाही.

पुण्यातील कार्यक्रमात 5 ते 10 हजार लोक जमतात, तिथे कोरोना होत नाही. भाजपने काही केले तर लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते? असा सवाल पाटील यांनी केला. तर याबाबत खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले की कोरोनाचे नियम सर्वांना सारखे आहेत. कुठेही आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT