गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना आक्रमक; येरवडा चौकात 'तिरडी आंदोलन' SaamTvNews
मुंबई/पुणे

गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना आक्रमक; येरवडा चौकात 'तिरडी आंदोलन'

मोदी सरकारने घरघुती गॅसच्या वाढलेल्या किंमती तातडीने कमी कराव्यात अशी मागणी या वेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

गोपाल मोटघरे

पुणे : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमती तसेच घरगुती व व्यावसायिक गॅसच्या किंमतीत झालेली प्रचंड दरवाढ याविरोधात पुण्यातील शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून येरवडा चौकात शिवसेनेच्या वतीने 'तिरडी आंदोलन' करण्यात आले. या आंदोलनात गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी सर्वसामान्य गृहिणींना मातीच्या चुलींचे वाटप केले.

हे देखील पाहा :

यावेळी शिवसैनिकांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रातील मोदी सरकारमुळे घरगुती गॅसचा दर ४०० रूपया वरून १००० रूपया पर्यंत पोहोचला आहे. तरी देखील मोदी सरकार सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

'सबका साथ, सबका विकास' असा नारा मोदी सरकारने निवडणुकीत दिला होता. मात्र, मोदी सरकारच्या काळात फक्त गॅस दरवाढ आणि इंधन दरवाढीचा विकास झाला. सर्वसामान्य गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. सर्वसामान्यांचे होणारे हाल थांबविण्यासाठी, मोदी सरकारने घरघुती गॅसच्या वाढलेल्या किंमती तातडीने कमी कराव्यात अशी मागणी या वेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

SCROLL FOR NEXT