Shiv Sena 16 MLAs Disqualified Case bjps plan b ready Will Ajit Pawar Next CM Maharashtra Politics Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लान बी तयार; आमदार अपात्र प्रकरणात मोठी घडामोड

Shiv Sena 16 MLAs Disqualified Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे.

Satish Daud

सूरज मसुरकर, साम टीव्ही

Shiv Sena 16 MLAs Disqualified Case Latest News

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केलं. या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने यातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं.

विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याने उद्धव ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर १८ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली.

या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांवर चांगलेच ताशेरे ओढले. पुढील एका आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदार अपात्र प्रकरणात निर्णय घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता कारवाईला वेग दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविल्यास सरकार वाचविण्यासाठी भाजपाने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचा पहिला पर्याय असतील.

याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील नाव चर्चेत आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत १०५ आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे ४० आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT