Ncp  saam tv
मुंबई/पुणे

Pune| ना शिंदे गट, ना शिवसेना... शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा डंका; ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला

पुण्यातील शिरूर(Shirur) तालुक्यातील ६ ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) घवघवीत यश मिळालं आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : राज्यात बंडाळीनंतर शिंदे गट आणि भाजप सत्तेस्थानी विराजमान झाला आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलले असताना शिरूरमध्ये त्याचा परिणाम जाणवला नाही. पुण्यातील शिरूर(Shirur) तालुक्यातील ६ ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) घवघवीत यश मिळालं आहे. (Shirur Gram Panchayat Election Result)

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल लागला आहे. या निकालात ६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी, जांबुत, म्हसे बुद्रूक, माळवाडी, सदरवाडी, तांदळी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक पार पडली आहे.

या निवडणुकीत गावकीभावकीच्या राजकारणावर अवलंबून असताना मात्र गावकीभावकीच्या राजकारणावर राजकीय पक्षांचे पुरस्कृत पॅनेल एकमेकांच्या विरोधात उभे होते. यावेळी या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकची पसंती दिली. तर शिवसेना आणि भाजपाने शिरूरच्या ग्रामीण भागात काही जागांवर यश मिळवलं आहे. या विजयानंतर उमेदवारांकडून गावागावात जल्लोष करण्यात येत आहे.

दरम्यान, टाकळी हाजी ग्रामपंचायतीध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ तर सर्व पक्षीय १ निवडून आले आहेत. म्हसे बुद्रूक गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ आणि भाजपचे २ सदस्य निवडून आले आहेत. माळवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि भाजपचा १ सदस्य निवडून आला आहे .सरदवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पुररस्कृत ५ आणि सर्व पक्षीय २ सदस्य निवडून आले आहेत. तर जांबूत गावात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ६ आणि सर्वपक्षीय ५ निवडून आले आहेत. तांदळी गावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत पॅनलचे १० तर भाजप पुरस्कृत पॅनेलचा १ सदस्य निवडून आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT