बुलडाणा: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील आव्हा येथील देशी दारू दुकान मालकाने चालवलेली दादागिरी भोवली असून त्याच्या देशी दारू दुकानाला जिल्हा प्रशासनाने सील लावले आहे. देशी दारू दुकान मालकाने येणाऱ्या ग्राहकाला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण (Crime) केल्याच्या प्रकरणावरुन जिल्ह्यातील अस्तित्व महिला संघटनेच्या महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.
काल, गुरुवारी देशी दारुचे दुकान सील करावे आणि दुकान मालकावर गुन्हे दाखल करून अटक करावी या मागणीसाठी दिवसभर रास्तारोको आंदोलन केले, त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. (Buldhana Crime News)
हे देखील पाहा -
अखेर देशी दारू दुकान मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने देशी दारू दुकानाला सील ठोकले. यावेळी रस्त्यावर उतरून असंख्य महिलांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश प्राप्त झाल्याने आव्हा गावात आनंद व्यक्त केला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.