shirdi sai baba temple gets record breaking donation of rs 17.5 crores in 10 days saam tv
मुंबई/पुणे

Shirdi Sai Baba : शिर्डीत भक्तांची मांदियाळी; दहा दिवसात साईचरणी तब्बल १७ कोटींचे दान

साई मंदिर परिसरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेत.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi Sai Baba News :

सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा वैश्विक संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये (diwali 2023) देशभरासह परदेशी असे लाखाे भाविक शिर्डी येथे साई बाबा यांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले हाेते. गेल्या दहा दिवसांत तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार रुपये भाविकांनी साईंच्या चरणी अर्पण केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यास साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दुजाेरा दिला. (Maharashtra News)

दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई भक्तांनी अलोट गर्दी केली हाेती. दिवाळी आणि भाऊबीज सण साजरे झाल्यावर भक्तांनी साईबाबांच्या दर्शनाला पसंती दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साई मंदिर परिसरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले हाेते.

साईंच्या दरबारात देशभरासह परदेशी भाविकही हजेरी लावत असतात. युरोपातील जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्‍ट्रीया, रशीया, चेक आणि डेन्‍मार्क या देशांतील ३७ महिला आणि १५ पुरुष अशा ५२ परदेशी भक्‍तांनी नुकतीच साई मंदिरास भेट दिली हाेती. सर्व परदेशी साईभक्‍तांनी साई संस्थानच्या प्रसादालयात प्रसाद भोजनाचा लाभ देखील घेतला हाेता.

दरम्यान १० ते २० नोव्हेंबर दरम्यान लाखो भाविकांनी साईंच्या दान पेटीत भरभरून दान दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ते म्हणाले दक्षिणा पेटी, देणगी काऊंटर, ऑनलाईन, चेक/डीडी, मनिऑर्डर, डेबीट- क्रेडीट कार्ड, सोने ,चांदी अशा सर्व माध्यमातून भरभरून दान प्राप्त झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT