Deepak Kesarkar On Teachers Protest saam tv
मुंबई/पुणे

Teachers Protest News: शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? शिक्षण मंत्री संपतापले

Deepak Kesarkar On Teachers Protest: शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? शिक्षण मंत्री संपतापले

Satish Kengar

>> सचिन बनसोडे

Deepak Kesarkar On Teachers Protest:

'अत्यंत चुकीची प्रथा महाराष्ट्रात पडायला सुरुवात झालीय. शिक्षकांनी जीआर वाचायला पाहिजे. शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? ', असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.

‘दत्तक शाळा योजना’ रद्द करावी, राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, यासह अनेक विविध मागण्यांसाठी शिक्षण-नोकरी बचाव समितीच्या पुढाकारातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केसरकर म्हणाले की, ''शाळेच्या विकासासाठी निधी देण्यात येतो. सगळ्यात जास्त निर्णय घेणारा मी मंत्री आहे. शिक्षक गावी राहत नसतांना सुद्धा भत्ते घेतात, याकडे मी जाणून बुजून दुर्लक्ष केलंय. शिक्षकांबाबत सर्व चांगले निर्णय घेऊन आमची बदनामी केली जातेय.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''शाळा मजबुतीकरणाच्या निर्णयामध्ये एकही शाळा बंद होत नाही. एकही शाळा बंद केली जाणार नाही आणि एकाही शिक्षकाला कमी केले जाणार नाही, हा निर्णय जाहीर केलाय. कुठल्या अधिकारात मोर्चे निघत आहेत, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय.''

दीपक केसरकर म्हणाले, लोकांना भडकवणारी लोक एका विशिष्ट संघटनेची आहेत. विद्यार्थ्यांना राजकारणापासून लांब ठेवा, असं विनंती त्यांनी केली आहे. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार असाल तर मला भूमिका घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मोर्चाला आणणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT