Shinde Sena leaders during a tense review meeting in Pune as internal differences surfaced ahead of civic elections. Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बैठकीत राडा, बडा नेता ढसाढसा रडला

Nana Bhangire Emotional During Shinde Sena: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिंदेसेनेच्या बैठकीत मोठा राडा झाला. अंतर्गत नाराजीमुळे शहरप्रमुख नाना भानगिरे भावुक झाले आणि बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले.

Omkar Sonawane

महानगपलिका निवडणूक अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली असताना आता महायुतीमधील धुसफूस दिसून येत आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीने महायुतीचे टेंशन वाढले असताना आता शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे बंधूंचा जागा वाटपाचा तिढा सुटला असून उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीये. तसेच शिंदे गटाचा ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक या ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित नसताना आता पुणेमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे.

पुण्यामध्ये शिंदे गटाची बैठक सुरू असताना मोठा वाद निर्माण झाला आणि एक नेता थेट बैठक सोडून निघून गेला. महायुतीमधील अंतर्गत नाराजी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो आता चव्हाट्यावर येत आहे. ऐन निवडणुकीच्यावेळी पुण्यात शिंदे गटात नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. शहरातील रामी ग्रँड या हॉटेलमध्ये शिवसेनेची बैठक सुरू होती. या बैठकीला नीलम गोऱ्हे , विजय शिवतारे, रविंद्र धंगेकर आणि शहरप्रमुख नाना भानगिरे हे उपस्थित होते.

पुण्यात शिंदेसेनेतील अंतर्गत अस्वस्थतेचा स्फोट पुन्हा एकदा उघड झाला आहे. शहरातील पक्षाच्या आढावा बैठकीत शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांना अश्रू अनावर झाले, तर काही वेळातच ते बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्याची घटना घडली. पुण्यातील या बैठकीत पक्षातील संघटनात्मक कामकाज, जबाबदाऱ्या आणि स्थानिक राजकारणावर चर्चा सुरू होती. मात्र बैठकीदरम्यान काही नेत्यांकडून झालेल्या टीका, दुर्लक्ष आणि नाराजीमुळे नाना भानगिरे भावनिक झाल्याचं सांगितलं जात आहे. उपस्थित कार्यकर्त्यांसमोरच ते ढसाढसा रडू लागल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर भानगिरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता बैठक सोडली. यामुळे पुण्यात शिंदेसेनेतील अस्वस्थता वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. आधीच जागावाटप, पदे आणि निर्णयप्रक्रियेवरून नाराजीचे सूर उमटत असताना, आता थेट बैठकीत घडलेल्या या नाट्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर भानगिरे हे नॉटरीचेबल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diljit Dosanjh: 'बॉर्डर २'चं सक्सेस बघून भावुक झाला दिलजीत दोसांझ, म्हणाला- मला कधीच माहित नव्हतं...

Black carrot halwa: घरच्या घरी कसा बनवाल काळ्या गाजराचा हलवा?

Maharashtra Live News Update: कर्तव्यपथावर शौर्यदर्शन! ३० चित्ररथांचं संचालन सुरु

Girija Oak: गोड गोजिरी, लाज लाजरी; गिरीजा ओकचं ब्लॅक आउटफिटमध्ये सुंदर फोटोशूट

Panchgrahi Yog: 500 वर्षांनंतर बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नोकरी-बिझनेसमध्ये मिळणार धनलाभाची संधी

SCROLL FOR NEXT