CM Eknath Shinde and Sanjay Raut  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: CM शिंदे यांच्यामुळेच राऊत खासदार झाले; संजय शिरसाट यांचा दावा

Sanjay Shirsat News: शिंदे गटातील नेते आमदार संजय शिरसाट यांनी एक मोठा दावा केला आहे.

Vishal Gangurde , सूरज सावंत

Mumbai News: शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात कमालीचा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. संजय राऊत यांच्याकडून शिंदे गटावर तुफान हल्लाबोल सुरू आहे. याचदरम्यान, शिंदे गटातील नेते आमदार संजय शिरसाट यांनी एक मोठा दावा केला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर भाष्य करताना संजय शिरसाट म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी सभा घ्याव्यात त्यात काही गैर नाही. आधीची आपण अडीच वर्षाची संधी ही गमावलेली आहे. त्यामुळे आता सभा घेतल्या तरी हरकत नाही. संजय राऊत सध्या खानदेशात म्हणजे जळगाव मध्ये आहेत. तिथे उन्हाचा पारा जास्त असल्याने आधीच वेळ असलेला माणूस आणखी वेडा झालेला आहे. त्यामुळे अशी बेछूट वक्तव्य ते करत असतात. मूर्खांचा जर कोण बादशाह असेल तर ते संजय राऊत आहे'.

'आम्हाला जे जमलं ते आम्ही करून दाखवलेला आहे. आमच्या जुगाडामुळेच संजय राऊत हे खासदार झाले आहेत. संजय राऊतच स्वतः एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते. माझी शेवटची टर्म आहे. त्यामुळे मला यंदा सांभाळून घ्या. नाहीतर संजय राऊत यांना कधीच पाडलं असतं. आमची मानसिकता होती ती शिंदे साहेब बोलले म्हणून आम्ही त्यांना मतं दिली, असा दावा शिरसाट यांनी केला.

'दुसरे संजय निवडून यायला पाहिजे होता हे आमचं प्रामाणिक मत होतं. परंतु मातोश्रीला प्राधान्य हे संजय राऊत यांना द्यायचं होतं. मतांची गोळाबेरीज पाहिली तर या संजय राऊत यांना जास्त मतांचा कोटा दिला. त्यामुळे संजय राऊत फक्त अर्ध्या मताने निवडून आलेले आहे. अर्ध्या डोक्याचा माणूस अर्ध्या मताने निवडून आलेला आहे, असेही शिरसाट म्हणाले.

'गुंड हा शब्द आदित्य ठाकरे यांच्या तोंडी योग्य वाटत नाही. त्यांनी प्रेम या शब्दावर जास्त जोर दिला पाहिजे. आपलं जे वय आहे आपण जे करतो ना त्यानुसार आपण बोललं पाहिजे. गुंड हा शब्द त्यांच्या तोंडी योग्य वाटत नाही. त्यामुळे प्रेम लव यावर त्यांनी बोलले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

'अजित दादांना आमच्या शुभेच्छा ते एक हार्ड वर्कर आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत ते काम करत असतात. त्यांना आमची एक विनंती आहे आमची विचारधारा त्यांनी जर स्वीकारली तर मुख्यमंत्री व्हायला त्यांना वेळ लागणार नाही. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट द्यावी, असेही शिरसाट म्हणाले.

'महाविकास आघाडीचा आता पर्याय अजित दादांना राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टात आता केस आहे, त्यात ते 14 आमदार देखील अपात्र होतील, आम्ही एकालाच ठेवलेला आहे. बाकी सर्वांबाबत आम्ही अपात्रेबाबत न्यायालयात धाव घेतलेली आहे. एका आमदारात मुख्यमंत्री होता येतं का ? असा सवाल शिरसाट यांनी केला.

'अजितदादांची देखील मानसिकता आता महाविकास आघाडी सोबत राहण्याची नाही. मुख्यमंत्री हा एकच असतो आणि एकच राहणार. मागेही सांगितलेलं आहे की पुढच्या सभेत अजित दादांना खुर्ची राहणार नाही. आजच्या सभेतून दिसेलच एकूणच अजितदादांना महाविकास आघाडीतून बाहेर काढलं जाण्याचा मानस हा केलेला आहे, अशी टीका देखील शिरसाट यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT