मुंबई/पुणे

KDMC Potholes: खड्डे बुजवण्यासाठीचे पैसे खड्ड्यात गेले; रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सत्ताधारी शिंदे गट आक्रमक

KDMC Potholes: कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत विरोधकांपाठोपाठ आता शिवसेना शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

kalyan dombivli latest news:

कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत विरोधकांपाठोपाठ आता शिवसेना शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय पाटील यांनी नागरिकांसह रस्त्यावरील खड्डयात बसून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी पाटील यांनी महापालिका आयुक्त नुसत्याच डेडलाईन देतात,खड्डे बुजवण्यासाठीचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेले आहे, असा आरोप केला. (Latest Marathi News)

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. पालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील, असे आश्वासन दिले होते. खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविले होते, ते पुन्हा उखडले गेले. अनेक ठिकाणी खड्डे बुजविलेच गेले नाही.

रस्त्यांवरील खड्डांबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड , मनसे आमदार राजू पाटील यांनी आक्रमक पवित्र घेतला होता. आता सत्ताधारी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने देखील आंदोलन करत आयुक्तांना खडे बोल सुनावले आहेत.

कल्याण पश्चिमेत चिकणघर परिसरात माजी नगरसेवक संजय पाटील यांनी खड्डयात बसून महिला नागरीकांसह आंदोलन केले आहे. यावेळी संजय पाटील म्हणाले, कल्याण डोंबिवली महापालिकेचे खड्डे बुजविण्याचे पैसे खड्यात गेले. 'महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खड्डयात टाकते. ते पैसे पाण्यात जातात. आमच्या महापालिकेतील आयुक्त फक्त बोलतात. खड्डे बुजवण्याच्या डेडलाईन देत वलग्ना करतात'.

'प्रत्यक्षात मात्र गणेशोत्सव सुरू झाला आणि संपत आला तरी रस्त्यांवरील खड्डे अजूनही कायम आहेत. ज्या रस्त्याने गणेश विसर्जन होणार आहे. त्या रस्त्यावर खड्डे आहेत आत्ता ही वेळ आली की, लोक न्याय करतील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी कोण? सासू, सून की जाऊबाई; लाडकी बहीण योजनेच्या लाभावरुन सासू-सुनांमध्ये महाभारत

ICICI नंतर आणखी एका बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का, मिनिमम बॅलेंसचं लिमिट अडीचपट वाढवलं

Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT