Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News, Aurangabad News Today saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे-फडणवीस सरकार स्थगिती देणार?

नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले होते. या बैठकीत नामांतराचा निर्णयही घेण्यात आला होता. आता राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस (Ekanath Shinde) सरकार या निर्णयाला स्थगिती देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे सरकारनं अखेरच्या क्षणी नियमबाह्यपणे हे निर्णय घेतले असून ते स्थगिती करुन नव्यानं निर्णय घेतले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Ekanath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं होतं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचं पत्र दिलं होतं. मात्र बहुमत सिद्ध करण्याअगोदरच उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्तावही बैठकीत मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान, राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती देणार असल्याचं सांगितलं जातंय. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्षेप घेतला होता. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Shinde-Fadnavis Government News)

MIM चा नामांतराला विरोध

दरम्यान, नामांतराचा प्रस्ताव मंजुर होताच, एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता. याविरोधात रस्त्यावर उतरुन लढा देण्याचा इशारा देत, कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या 'डेथ सर्टिफिकेट'वरही औरंगाबादचेच नाव हवं, असं ठणकावून सांगितलं होतं.

"जगभरात औरंगाबाद शहराची ऐतिहासिक ओळख आहे. परंतु केवळ हिंदुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही. यासाठी कायदेशीर लढाई उभारली जाईल, तसंच गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरु," असा इशारा जलील यांनी दिला होता. (Aurangabad News Today)

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT