Beed News | जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली; चौथीच्या विद्यार्थ्यांचा हात फ्रॅक्चर

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ
Beed News Today, Beed School News Today, Latest Marathi News
Beed News Today, Beed School News Today, Latest Marathi NewsSaam TV
Published On

बीड : बीडच्या (Beed) जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून, चिकल्यांच्या मुलांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत, शिक्षणाचे धडे देत असतांना, चौथीच्या वर्गात शिक्षण (School) घेणाऱ्या चिमुकल्या मुलाच्या अंगावर, जीर्ण भिंतीचा काही भाग पडला. आणि यामुळे चिमुकल्या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या कामखेडा गावांमध्ये घडली. (Beed News Today)

Beed News Today, Beed School News Today, Latest Marathi News
नको ते धाडस केलं, जीवावर बेतलं; मोटरसायकलसह दोघे पुरात गेले वाहून

कुंदन विजय ओव्हाळ (वय 10 वर्ष) असं हात फ्रॅक्चर झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. विशेष म्हणजे जखमी कुंदन समावेत इतरही चिमुकले मुलं या वर्ग खोलीत होते. जर एखाद्या मुलाच्या डोक्यात भिंतीचा दगड पडला असता अथवा भिंतीचा मोठा भाग पडला असता, तर मोठी दुर्घटना देखील घडली असती. मात्र सुदैवाने मोठी हानी टळली आहे.

बीड तालुक्यातील कामखेडा गावातील जिल्हा परिषेची उर्दू आणि मराठी माध्यमाची शाळा आहे. 1950 पासून या शाळेत अनेक विद्यार्थी घडले आहेत. मात्र याच शाळेच्या इमारतीच्या भिंतीकडे आणि छताकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने आज या शाळेची दुरवस्था झाली आहे. (Latest Marathi News)

मराठी आणि उर्दू शाळेचे जवळपास 200 विद्यार्थी असलेल्या या शाळेतील काही वर्गखोल्यांचे छत, भिंती आणि पत्रदेखील तुटलेले आहेत. तर पर्यायी व्यवस्था नसल्याने, याच शाळेतील एका वर्ग खोलीत, चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात होते. यादरम्यान अचानक जीर्ण वर्ग खोलीच्या भिंतीचा, काही भाग चिमुकल्या कुंदन ओव्हाळ याच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला.

Beed News Today, Beed School News Today, Latest Marathi News
लग्नासाठी वाट्टेल ते! भरपावसात पुराच्या पाण्यातून नवरदेवाचा जीवघेणा प्रवास

बीड जिल्ह्यात तब्बल 460 वर्गखोल्या धोकादायक

जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील तब्बल 264 शाळाच्या इमारतीत मधील तब्बल 460 वर्गखोल्या धोकादायक आहेत.तर या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, विद्युत जोडणी नाही,यासह जुन्या इमारती यामुळे दर्जेदार शिक्षण मिळणार कसे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर याच शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे, बीडच्या कामखेडा गावामध्ये दुर्घटना घडल्याने, चिमुकल्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

'शाळेच्या खोल्या बसण्यायोग्य नाही'

या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका राजकन्या पवार म्हणाल्या , की ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतून खूप मोठा अनर्थ टळला आहे. त्याच्या हातावर पडल्याने फ्रॅक्चर झाला, मात्र डोक्यात भिंतीचा भाग जर पडला असता, तर गंभीर बाब घडली असती. या शाळेच्या खोल्या बसण्यायोग्य नाहीत, मात्र शाळा भरवली जाते. कालपर्यंत आम्हाला पर्याय व्यवस्था नसल्याने, याच खोल्यात बसत होतो. मात्र आता पर्यायी व्यवस्था केली आहे. या शाळेत उर्दू आणि मराठी शाळा भरते. उर्दूसाठी 108 तर मराठीसाठी 98 विद्यार्थी येतात. तर शिक्षण विभागाला ही घटना घडण्यापूर्वी या अगोदरच्या मुख्याध्यापकांनी अनेक वेळा शाळेच्या इमारतीविषयी सांगितलं होतं. असंही यावेळी मुख्याध्यापिका पवार म्हणाल्या. (Beed School News Today)

'याचे निवेदन आम्ही, शिक्षण विभागाला दिले होते'

याविषयी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे म्हणाले, की मान्सूनपूर्व शाळेच्या धोकादायक इमारतीची दुरुस्ती करावी, यासाठी, जिल्ह्यातील 264 शाळेतील 460 वर्गखोल्या धोकादायक आहेत. याचे निवेदन आम्ही, शिक्षण विभागाला दिले होते. त्यावेळी सीईओ, शिक्षणाधिकार्यांनी देखील त्यांनी हे मान्य केलं होतं. मात्र यावर कोणतीच कारवाई त्यांनी केली नाही. जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी त्यांच्या मुलांना अशा शाळेमध्ये शिकवतील का ? त्यामुळे कामखेडा शाळेतील दुर्घटनेप्रकरणी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केले आहे

दरम्यान एकीकडे गावखेड्यातील जिल्हा परिषद शाळा कात टाकत असून शाळेचा दर्जा सुधारला आहे. मात्र शिक्षण विभागाकडून याचं शाळेतील चिमुकल्या मुलांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे. धोकादायक शाळेच्या इमारतीमध्ये मुलांना शिक्षण दिलं जातंय. त्यामुळं आता तरी या दुर्घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील हे भेसूर वास्तव बदलणार का ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Beed News Today)

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com