Maratha Reservation  Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट, राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण मोहीम सुरु आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. याच सर्वेक्षणाला दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे राज्य मागसवर्ग आयोगाला सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी राज्य सरकारने २३ ते ३१ जानेवारी कालावधित राज्य मागासवर्ग आयोगाला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. आज मंगळवारी आयोगाच्या या सर्वेक्षणाला दोन दिवसांची मुतदवाढ देण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाइन बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्वेक्षण करण्यास दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत २ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण सुरु राहणार आहे.

सगेसोयरे अधिसुचनेवर हायकोर्टात कॅव्हेट दाखल

मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे अधिसुचनेवर हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील वसंत साळुंखे यांनी हे कॅव्हेट दाखल केले आहे. सगेसोयरेच्या अधिसुचनेला गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅव्हेट दाखल केले असल्याचे याचिकाकर्ते साळुंखे यांनी म्हटले आहे.

कॅव्हेटमध्ये गुणरत्न सदावर्ते यांना देखील पार्टी करण्यात आलं आहे. सदावर्ते किंवा इतर कोणी सगेसोयरे अधिसुचनेच्या विरोधात याचिका दाखल केल्यास, आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नये, अशी मागणी कॅव्हेटमध्ये करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT