toll free Saam TV
मुंबई/पुणे

Toll-free entry in Mumbai : मुंबईकरांना टोलमाफीचं गिफ्ट; कोणत्या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना 'टोल फ्री'? VIDEO

Toll-free entry in Mumbai News : आचारसंहितेपूर्वी अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला.... हा निर्णय़ निवडणुकीपूरता आहे का? त्याबरोबरच या निर्णयाचा मुंबईकरांना किती फायदा होणार? तसंच सरकारला किती भुर्दंड बसणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मोठा मास्टरस्ट्रोक मारलाय...मुंबईत प्रवेश करणाऱ्या हलक्या वाहनांना टोल माफी कऱण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.. ही टोलमाफी कोणत्या नाक्यांवर असणार आहे? पाहूयात...

वाशी टोलनाका

मुलुंड टोलनाका

आनंदनगर टोलनाका

ऐरोली टोलनाका

दहिसर टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आलीय..

मुंबईच्या प्रवेशद्वारावरच्या हलक्या वाहनांना सरकारने टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला असला तरी ही हलकी वाहनं कोणती आहेत? पाहूयात....

हलकी वाहनं म्हणजे काय?

जीप, कार, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचा समावेश

वाहनाचं वजन 7500 किलोपेक्षा कमी असावे

हलक्या वाहनाची इंजिन क्षमता 500 CC किंवा त्यापेक्षा कमी असते

हलक्या वाहनांची नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असते

सर्वसामान्य प्रवाशांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय.. मात्र हा निर्णय निवडणूकीपुरता तर नाही ना? अशी शंका उपस्थित केलीय.. दुसरीकडे हा ऐतिहासिक मास्टरस्ट्रोक असून निवडणुकीनंतरही टोलमाफी कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.

हलक्या वाहनांना 'टोल फ्री'

राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना किती फायदा आणि किती तोटा? पाहूयात...

दहिसर, आनंदनगर, वाशी आणि ऐरोली नाक्यावर 45 रुपये टोल

मुलुंड टोलनाक्यावर 75 रुपये टोलमाफी

टोलमाफीची मुदत 2026 पर्यंत

मुंबईतील 2 लाख 80 हजार हलक्या वाहनांना होणार फायदा

टोलमाफीमुळे दरवर्षी सरकारला 500 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

टोलमाफीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा एवढंच नाही तर राज ठाकरेंना पुन्हा जवळ कऱण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा मास्टरस्ट्रोक महायुतीला फायद्याचा ठरणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mohammed Siraj : व्हिलन टू हिरो! मोहम्मद सिराज कसा बनला भारताच्या विजयाचा शिल्पकार?

Shravan Special Dish : श्रावण स्पेशल चमचमीत अळूची भाजी, वाचा पारंपरिक रेसिपी

दारू पिऊन लोकलमध्ये चढला, पोलिसाचं महिला प्रवाशांसोबत घाणेरडं कृत्य; अश्लील इशारे करत अंगाला स्पर्श

महापालिकेचा जेसीबी पाहताच संतापाचा स्फोट! संभाजीनगरमध्ये लाठीमार अन् हाणामारी, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Pune Crime: मला माहिती नाही माझ्या पत्नीचं काय झालं, खरपुडीमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार?

SCROLL FOR NEXT