Devendra Fadanavis and eknath Shinde
Devendra Fadanavis and eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस सरकारचा एसटी कामगारांना मोठा दिलासा; घेतला हा महत्वाचा निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाला १०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३६० कोटींची मागणी होती. त्यातील १०० कोटींना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या १०० कोटींमुळे आता कर्मचाऱ्यांचा वेतन सुरळीत होणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी एसटी कामगारांचा ३ महिने आंदालन सुरू होते, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा तोटा झाला आहे.

एसटी महामंडळाला सध्या ३६० कोटींची गरज आहे. यातील १०० कोटींना राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागणी करण्यात आली होती.राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे जूनचे वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाला ३६० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १ हजार ४५० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यातील ३०० कोटी रुपये एप्रिलसाठी, तर ३६० कोटी रुपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी वेतन विलंबामुळे एसटी कामगारांनी केला होता संप केला होता.

वेतन वाढीसाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन सलग तीन महिने सुरू होते, त्यामुळे एसटीचे तसेच कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

Ratnagiri Lok Sabha Election 2024 Voting LIVE: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT