Uddhav Thackeray And Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

ठाकरे सरकारची महत्वाची योजना सुरुच ठेवण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारची महत्वाची मंत्रीमंडळ बैठक आज पार पडली, या बैठकीत हा निर्यण घेण्यात आला.

Jagdish Patil

सुशांत सावंत -

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रीमंडळ बैठक आज पार पडली. या बैठकीत ठाकरे सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आढावा घेण्यात आला. या आढाव्या दरम्यान शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी शिंदे-फडणवीस सरकार बंद करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. शिवाय शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय देखील सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला होता.

पाहा व्हिडीओ -

याच पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) शिवभोजन थाळी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि ही थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ही योजना बंद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आता आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला नियमित सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली.

तर काही निर्णयांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी देखील सत्ताधारी बंद करणार की काय अशा चर्चा सुरु होत्या मात्र शासनाच्या आजच्या निर्णयामुळे तुर्तास तरी या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT