काम पाहून का आडनाव पाहून?... दादासाहेब फाळके पुरस्कारावरुन नवा वाद

दादासाहेब फाळके पुरस्कार काम पाहून की आडनाव पाहून दिला असा प्रश्न हिंदु महासंघाच्या आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.
Asha Parekh
Asha ParekhSaam TV
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: चित्रपटसृष्टीतील महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला असून तो ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांना देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज घोषणा केली आहे.

मात्र, दादासाहेब फाळके पुरस्कार हा काम पाहून की आडनाव पाहून दिला असा प्रश्न हिंदु महासंघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांनी उपस्थित केल्यामुळे या पुरस्कारामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Asha Parekh
Asha Parekh : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

या पुरस्कारावर आक्षेप घेताना आनंद दवे म्हणाले की, फाळके पुरस्कार काम पाहून का आडनाव पाहून? पारेखांपेक्षा आपले सचिन उजवे ठरतात. चित्रपटात कामं करणं आणि चित्रपटसृष्टीसाठी (Film Industry) योगदान यात काही फरक नाही का? असा सवाल दवे यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, आशा पारेख यांच्या भूमिका, त्यांची कला, विविधता, नृत्य चांगले आहेतच. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते आजपर्यंत सतत ७० वर्ष सक्रिय राहणं सुद्धा उत्तमच आहे. पण हे सर्व व्यक्तिगत झालं, यामध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी काय केल हा प्रश्न उरतोच.

गुजरातच्या येणाऱ्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील गुजरात्यांच वर्चस्व त्यांच्या समाधानासाठीच हा निर्णय घेतला असावा असा आरोप देखील दवे यांनी केला आहे. आशा पारेख यांचे आत्ता सर्वत्र सन्मान, सत्कार होतील त्याला स्थानिक भाजपनेते उपस्थित राहतील आणि अपेक्षित निकाल येतील अशी टीकाही दवे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com