shinde-Fadnavis Cabinet Expansion
shinde-Fadnavis Cabinet Expansion saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, कोणत्या नेत्याला मिळणार मंत्रिपद? नेत्यांमध्ये चुरस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घातली.

शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता सहा महिने पूर्ण होत असून, या सहा महिन्यात एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, आता शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराबरोबरच राज्यातल्या महामंडळांच वाटप होणार होणार असल्याची माहिती आहे. शिंदे सरकारच्या (Maharashtra Government) महामंडळ वाटपाचा देखील फॅार्म्यूला ठरला आहे. तसेच कोणाला किती महामंडळ मिळणार याची यादी देखील तयार झाली आहे. मात्र, अद्याप पर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरलेली नाही. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदासोबतच महामंडळ मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये जोरदार चुरस देखील सुरु झाली आहे.

दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातून अनेक आमदारांना डावलण्यात आलं. त्यामुळे मंत्रिपदाची आस धरून बसलेले अनेक भाजप आमदार तसेच शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

मात्र, शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळणार याकडे आता राजकीय वर्तुळ चर्चा सुरु आहे.

पहिल्या टप्प्यात 'या' मंत्र्यांनी घेतली शपत

तानाजी सावंत

उदय सामंत

संदीपान भुमरे

दादा भुसे

अब्दुल सत्तार

दीपक केसरकर

शंभूराज देसाई

संजय राठोड

गुलाबराव पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Thackeray Group : ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

Ghee Benefits: रोज एक चमचा तूप खा अन् आरोग्याच्या समस्या दूर करा

Maharashtra Lok Sabha Voting Live: ओशिवारामध्ये भाजप-ठाकरे गट आमने-सामने

Control Sugar Level : सकाळी उठल्यावर शुगर वाढतेय; रात्री झोपण्याआधी 'ही' कामे करा डायबिटीज कंट्रोलमध्ये राहिल

Electric Shock : थंड पाणी भरताना वॉटर कुलरमधून विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT